कन्हान परिसरात ठिकठिकाणी ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कन्हान परिसरात ठिकठिकाणी ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


कन्हान : -  कन्हान परिसरात शासकिय शाळा , विद्यालय , सामाजिक संस्था , विविध संघटना व्दारे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला . 

     


हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान



हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे प्रजासत्ताक दिवस शाळेचे अध्यक्ष नरेंद्र वाघमारे आणि माजी मुख्याध्यापिका वंदना रामापुरे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला . प्रशांत मसार , धनंजय कापसिकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते . झेंडा वंदना नंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले आणि सोबतच क्रिडा महोत्सवाचे बक्षीस वितरण करण्यात आले . कार्यक्रमाची प्रास्तविक मुख्याध्यापक हेमंत वंजारी हयांनी केले तर आभार प्रदर्शन पवनकुमार ठमके यांनी केले . यावेळी आयेशा अन्सारी , गीता वंजारी , भास्कर सातपुते , अभिषेक मोहांकर , जयश्री पवार , किर्ती वैरागडे , नेहा गायधने , मंदाकिनी रंगारी , योगिता चांदेवर , गणेश रामापुरे , स्वर्णा रामापुरे आदी शिक्षक सह विद्यार्थी व पालक उपस्थित होते .


यशवंत विद्यालय , वराडा



यशवंत विद्यालय वराडा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर यांचा अध्यक्षेत आणि वराडा ग्रामपंचायत सरपंच मा. सुनिल जामदार यांचा हस्ते पार पगला . सर्वप्रथम महात्मा गांधी , डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रीय ध्वजाचे पुजन , पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले . या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस पाटील संजय नेवारे , वराडा ग्रामपंचायत सदस्य प्रणय गुरांदे , अमित घारड , जेष्ट नागरिक प्रभुजी चिखले , आंनदराव गुरांदे , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती निंबाळकर , माजी विद्यार्थीनी आदिती जामदार , अश्विनी राऊत प्रामुख्याने उपस्थित होते . शाळेत (दि.१) जानेवारी पासुन आयोजित विविध स्पर्धा , कार्यक्रमाचे बक्षीष वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले . प्रसाद वितरण करून ७६ वा प्रजासत्ताक दिन थाटात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती निंबाळकर , शिक्षिका अर्चना शिंगणे , स्वर्णा गावंडे , शिक्षक राजेंद्र गभणे , राकेश गणविर , सतिश कुथे , मोतीराम रहाटे , दीपक पांडे सह विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले . 


सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान


सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे ७६ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ पडोळे व सौ.छायाताई नाईक यांच्या हस्ते आणि वासुदेवराव चिकटे अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय यांचा प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर संविधान प्रस्तावना वाचन करुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगान गायन करण्यात आले . "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" या कार्यक्रमाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तु देऊन गौरव करण्यात आला . कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दिनकरराव मस्के आणि मान्यवरांनी प्रजासत्ताक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले .  या प्रसंगी वसंतराव इंगोले , प्रकाशराव नाईक , मायाताई इंगोले , आशाताई भोमले , सुनिता येरपुडे , अल्काताई कोल्हे ,  गुलाबराव ढोबळे , पुरुषोत्तम कुंभलकर , योगेश बर्वे , मिलिंद वाघधरे , सुमित घोरपडे , मनिष उईके , कु प्रिया तांबे , किशोर चिकटे , एन के खानजोडे , आकाश गुप्ता , रवि वानखेडे , राहुल पारधी , शुभम शेंडे , प्रदीप भोंडे , शुभम कावळे , कृणाल कोल्हे इत्यादी सभासद वाचक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिव मनोहर कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले . सर्व उपस्थितांना मिठाई वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .


मांग-गारोडी सामाजिक संघटना कन्हान


 कन्हान तारसा रोड वरील झेंडा चौक विष्णुलक्ष्मी नगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष बैजुजी भालेकर , प्रमुख पाहुणे आंबादास खंदारे , रघुनाथ पात्रे , मोरेश्वर खडसे , किशोर शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते . सर्वप्रथम महापुरषांच्या प्रतिमेला मान्यवरांचा हस्ते पुष्प हार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले . यावेळी मांग - गारोडी सामाजिक संघटनेचे कॅलेंडर चे विमोचन करण्यात आले . या प्रसंगी सतीश नाडे , भुरा पात्रे , सावन लोंढे , सनी पात्रे , बादल लोंढे , आर्जुन पात्रे , वीर गायकवाड , किंमत पात्रे , सुमित पुरवले , भाटिया पात्रे , किरण पेटारे , चंदन गाय कवाड , सूर्या पात्रे , गोलु थवाईत , रामा पात्रे , सिद्धार्थ पात्रे , रजित खडसे , अंकित बचले , रोहित खडसे सह आदि नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन नेवालाल पात्रे यांनी तर आभार भुरा पात्रे यांनी मानले .


मनोज मनगटे मित्र परिवार


मनोज मनगटे मित्र परिवार द्वारे  साई इंटरप्राईजेस कन्हान समोर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . सामाजिक कार्यकर्ता प्रदीप कनोजे , मनोज मनगटे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी शालेय विद्यार्थांना मिठाई , बिस्कीट , वाटप करण्यात आले . या प्रसंगी  

हेमराज इंगोले , मुकेश कुंभलकर, अब्दुल हाकी सह आदि नागरिक उपस्थित होते .


रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान


रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हान च्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरुवातीला रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी २६  प्रजासत्ताक दिना निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिना च्या शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी चेतन मेश्राम , मनोज गोंडाने , नितीन मेश्राम , अश्वमेघ पाटील , खुशाल बन्सोड , शरद मेश्राम , संदिप शेंडे , बाबुलाल रामप्रसाद , सिद्धार्थ पानतावणे , महादेव पाटील , शैलेश दिवे , रविंद्र दुपारे , आनंद चव्हान , प्रवीण सतदेवे , अनिल डोंगरे , महेश चव्हान , सह आदि पदाधिकारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .


सर्वधर्म समभाव संघटन कन्हान 


सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे प्रजासत्ताक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले . संघटने चे अध्यक्ष चंदन मेश्राम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .यावेळी विद्यार्थांना शालेय सामग्री वाटप करुन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या प्रसंगी नितिन मेश्राम , बाबा भाई , दिलिप निंबोने , आर्यन मेश्राम , विनोद मसार , दिपक ठाकुर , किशोर यादव , सोनु कापसे , कृणाल शेंडे , सुशील इरपाते , पुष्पा देवांगण सह आदि नागरिक उपस्थित होते .


महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कन्हान


महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता व युवा पत्रकार ऋषभ बावनकर , प्रमुख पाहुणे जगन कारेमोरे , कैलास राऊत , कुसुम मेहरकुळे , रंजना वाडीभस्मे सह आदि मान्यवरांचा हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर ध्वजारोहण करुन तिरंगा झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले . कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रजासत्ताक दिना च्या शुभेच्छा दिल्या . निबंध स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा , स्पर्धेतील व शिशु मंदिर मुलांना पारितोषिक वितरण करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन रंजना पवनीकर यांनी केले .


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र कारेमोरे  , प्रमुख पाहुणे व्यंकटेश कारेमोरे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले . सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्ती गीत , सावित्रीबाई फुले नाटीका , बेटी बचाओ , बेटी पढ़ाओ थीम वर आधारित नृत्य , वर्गखोली उद्घाटन सह आदि विविध कार्यक्रम करुन प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची प्रस्ताविका घरडे सर , सूत्र संचालन मोहुर्ले सर , आभार प्रदर्शन संबोजी मैडम यांनी केले .



एम.जी.एस. संविधानिक हक्क संघटन कन्हान


एम. जी.एस. संविधानिक हक्क संघटन कन्हान द्वारे  प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष रामेश्वर शेंडे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि ध्वजारोहण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी संघटने चे अध्यक्ष गणेश भालेकर , उपाध्यक्ष समशेर पुरवले , प्रितम शेंडे , पत्रकार  धनंजय कापसीकर , युवा पत्रकार ऋषभ बावनकर यांनी प्रजासत्ताक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . लहान मुलांना मिठाई वाटप करुन प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार संघटने चे सचिव अर्जुन पात्रे यांनी केले . या प्रसंगी कृष्णा पात्रे , माणिक खडसे , आशिष इंचुरकर , महेश लोंढे , शिवा पात्रे , महेंद्र पात्रे , अनिल लोंढे , पाउलाल लोंढे , आसन पात्रे , सावन लोंढे , रुपचंद मेश्राम ,

शशिकांत दारुंडे , नितिन मेश्राम , संजय तीवस्कर , जितेंद्र पात्रे , शिरीष त्रिपाठी , रामा पात्रे , दिलीप भोयर , किसना खडसे ,अंकुश खडसे , नितिन भिसे , अरविंद लोंढे , राज भिसे , धिरेन खडसे , किरण शेंडे , गौरव लोंढे , सावन रोकडे , वणील लोंढे , हरीश लोंढे , भाटिया पात्रे , मंगेश पात्रे , अनुज खडसे , सोनू लोंढे , सूरज बोरकर , बंडू मोटघरे , राज खडसे , अंकुश बछले , वीरेंद्र पात्रे , विशाल खडसे , मनिष शेंडे , चांपा वानी , मिना पात्रे , मनिषा पात्रे , उषा पात्रे , जांकाबई पेटारे , पल्लवी पात्रे सह आदि नागरिक मोठ्या उपस्थित होते .


केडीके कॉन्व्हेंट शाळा टेकाडी 


केडीके कॉन्व्हेंट शाळा टेकाडी येथील प्रांगणात ७६ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जिल्हा परिषद सदस्य व्यकटेश कारेमोरे यांच्या हस्ते महापुरषांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . त्यानंतर ध्वजारोहण करुन तिरंगा झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले .

शाळेच्या मुखधापिका निशा मैडम आणि मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरित करुन प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनिषा मैडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन सुरेख मैडम यांनी केले . कार्यक्रमांच्या अपर्ण मैडम रिना मैडम विध्यार्थी पालक होते . या प्रसंगी शाळेचे संचालक अविनाश कांबळे , पंढरी बालबुधे , पुंडलिक कुरडकर , सुरेश मोहाडे , अमोल राऊत सह आदि विद्यार्थी , शिक्षक , पालक आणि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या